खबरे

नागाला जिवनदान देणारा सर्पमित्र -हेमंत गावड

सफाळे  (KBN 10 News) : विषारी नागाला सुरक्षित रित्या पकडून त्याला जिवनदान देणारे सर्पमित्र हेमंत गावड (सफाळे) येथिल नागरिकांना संकट समयी नेहमी कामी येतात म्हणून त्यांना या परिसरात सर्पमित्र म्हणून ओळखले जाते. 
        बुधवार दिनांक 20जुलै रोजी सफाळे येथिल बाळु राऊत यांच्या गाईच्या गोठ्याात कोबड्याांच्या बसनेच्या ठिकाणी भला मोठा विषारी नाग काहीतरी खावून नितचीत पडलेला बाळु राऊत यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी आपले मित्र हेमंत गावड यांना मोबाईल वरून संपर्क केला व गोठ्याामध्ये भला मोठा विषारी नाग असल्याचे सांगितले. हेमंत गावड यांनी त्या सर्पाला कुठलीही विजा पोहचू नका मी तेथे लगेच पोहचतो असे सांगितले . त्या नंतर हेमंत गावड यांनी त्याठिकाणी पोहचून पाहिले असता अतिशय विषारी नाग असल्याचे त्यांची खात्री झाली.त्यांनी लगेचच त्या नागाला सुरक्षित रित्या पकडले तेव्हा तो नाग काहितरी खाल्याने त्याला हालचाल करणे अवघड जात होते.
kbn10 news safaale 1
त्यांनी नागाची सेपटी पकडून नागाला उलटे केले असता , नागाने गिळलेली कोंबडीची चक्क अकरा अंडी बाहेर टाकली. त्यानंतर त्यांनी त्या नागाला अंघोळ घालून त्याला कुठलीही विजा झाली नाही याची खात्री केली व आपल्या मित्रांन सोबत दूर असलेल्या जंगलात सुरक्षित रित्या सोडून दिले,व नागाला जिवनदान मिळाले व बाळु राऊत यांचे संकट टळले.
    हेमंत गावड हे या परिसरात गेले 25 वर्षापासून प्राणिमित्र व सर्पमित्र म्हणून काम करतात त्यांनी 25 वर्षाच्या कालावधीत अनेक सर्पांना जिवनदान देवून सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. प्राण्यांन बद्दल त्यांना प्रचंड आवड व जिज्ञासा असल्याने कुठल्याही मुक्या जाणावरांसाठीचे दुःख त्यांना आपले दुःख वाटते. अपघातातील एखादा प्राणि असो कि एखादा विषारी सर्प असो त्याला सुरक्षित जिवनदान देण्याचे काम प्रामाणिक पणे ते पार पाडतात, अश्या या सर्पमित्राला सलाम .

Related Articles

Back to top button
Close