खबरे

पालघर जिल्ह्यातला डहाणू – तलासरी परिसर सहा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; धावपळीत एका चिमुरडीचा मृत्यू

नीता चौरे ,पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी आसपासचा परिसर शुक्रवारी रोजी भूकंपानं हादरला असून या परिसरात शुक्रवारी सकाळी  ६ वाजून ५८ मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर द

१० वाजून ३ मिनिटांनी दुसरा , १० वाजून २९ मिनिटांनी तिसरा ,२  वाजून ६ मिनिटांनी चौथा ,३ वाजून ५३ मिनिटांनी पाचवा आणि  ४ वाजून ५७  मिनिटांनी सहावा भूकंपाचा धक्का बसलाय.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी अक्षांश २०° व रेखांश ७२.९° यया भौगोलिक स्थानावर ३.३ रिस्टर स्केल चा भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा बिंदू भुगर्भात १० किलोमीटर खोल असून हा भोगोलिक बिंदू डहाणूच्या पूर्व भागात असल्याचं स्पष्ट होतयं . तर शुक्रवारी सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी दुसरा अक्षांश २०° व रेखांश  ७२.९° या भौगोलिक स्थानावर ३.५ रिश्टर स्केल चा भूकंपाचा धक्का बसला .१० वाजून २९ मिनिटांनी अक्षांश २०° व रेखांश ७२.९° या भौगोलिक स्थानावर ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा , २  वाजून ६ मिनिटांनी  अक्षांश १९.९°व  रेखांश ७२.८°  या भौगोलिक स्थानावर  ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा ,३ वाजून ५३ मिनिटांनी अक्षांश   १९.९°व  रेखांश ७२.८° या भौगोलिक स्थानावर ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पाचवा  , ४ वाजून ५७ मिनिटांनी अक्षांश १९.९° व रेखांश  ७२.९° या भौगोलिक स्थानावर ३.५ रिश्टर स्केल  तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला  . दुसर्‍या , तिसर्‍या ,चौथ्या ,पाचव्या आणि सहाव्या भूकंपाचा बिंदू भुगर्भात ५ किलोमीटर खोलवर होता .

आतापर्यंत चे धक्के ……..

  • ११ नोव्हेंबर – ३.२ रिश्टर स्केल ,
  • २४ नोव्हेंबर – ३.३ रिश्टर स्केल,
  • ३१ डिसेंबर – ३.१  व २.९ रिश्टर स्केल लागोपाठ दोन धक्के ,
  • ४ डिसेंबर – ३.२ रिश्टर स्केल ,
  • ७ डिसेंबर – २.९  रिश्टर स्केल ,
  • १० डिसेंबर – २.८ व २.७ रिश्टर स्केल  लागोपाठ दोन धक्के ,
  • २० जानेवारी  – ३.६ व ३.०० असे दोन भूकंपाचे धक्के ,
  • २४ जानेवारी – ३.४ रिश्टर स्केल ,
  • दि .१ फेब्रुवारी – रोजी ३.३ , ३.५ , ३.० व ४.१,३.५ ,३.६ रिश्टर स्केल असे चार भूकंपाचे धक्के बसलेत .

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात डहाणू -तलासरी व आसपासच्या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाच्या हादऱ्यांचं सत्र सुरूचं आहे . गेल्या तीन महिन्यांत बरेच सौम्य धक्के बसल्याची नोंद देखील करण्यात आली आहे . वारंवार च्या बसणाऱ्या या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून भीतीनं लोक रात्रभर कडाक्याच्या थंडीत आपल्या मुलाबाळांसह घराबाहेर झोपतायेत .

परिस्थितीनुसार प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत . सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य विभागास त्यांची यंत्रणा विशेषतः भूकंप प्रवण भागात ठेवण्यास सांगण्यात आलं आहे .कोणीही अफवा पसरू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे .

दक्षता म्हणून या भागातल्या ज्या नागरिकांची घर कच्च्या बांधकामांची किंवा असुरक्षित आहेत त्यांनी रात्री घरात न थांबता बाहेर सुरक्षित ठिकाणी झोपावं . स्थानिक अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दक्ष करावं . असं आवाहन संचालक राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष यांच्यामार्फत करण्यात आलं आहे .

वारंवार येणारा भूकंपाच्या झटक्यांना गंभीरतेनं घेत पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी म्हटलंय की ,  शुक्रवारी मी भूकंपप्रवण क्षेत्रांचा दौरा केला .आणि शुक्रवारी आलेल्या भूकंपाच्या सहा  झटाक्यां मध्ये  एका झटक्याची तीव्रता  ४.१ रिस्टर स्केल  इतकी नोंद करण्यात आली आहे. हळूहळू भूकंपाची तीव्रता वाढत असल्याचं पाहता जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . आम्ही एनडीआरएफ च्या टीम कडून १०० टेंट मागविले असून डहाणू तालुक्यातल्या  क्षेत्रात ३० टेंट तर  तलासरी तालुक्यातल्या क्षेत्रात १२ टेंट लावण्यात येणार असून धुंदलवाडी परिसरात टेंट लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे . एकूण ४२ टेंट लावण्यात  येणार आहेत .आम्ही त भक्तिवेदांत आणि इतर दोन  हॉस्पिटल ला रिक्वेस्ट केली आहे . त्यानुसार ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत अशा नागरिकांची आज रात्रीची राहण्याची व्यवस्था या हॉस्पिटल्समध्ये करण्यात आली आहे .२०  जणांची  एनडीआरएफची टीम देखील इथं बोलवण्यात आली आहे. ॲम्बुलन्स ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे  . व ह्या भूकंपप्रवण क्षेत्रात  क्षेत्रातल्या तलाठी व ग्रामसेवक यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत . अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे .

धावपळीत एका चिमुरडीचा मृत्यू ………..

डहाणू तालुक्यातल्या हळदपाडा इथं लहान मुलं खेळत असताना जोरदार भूकंपाचा धक्का बसल्यानं मुलं घाबरून पळताना  वैभवी लक्ष्मण भूयाळ या २ वर्षीय चिमुकलीचा दगडावर आदळून मृत्यू झाला आहे..

 

पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी गावच्या समुद्र किनारी रंगणार सातवा चिकू फेस्टिवल……..

Related Articles

Back to top button
Close