खबरेमहाराष्ट्रराज्य

मशाल गौरव आदर्श पत्रकार ‘पुरस्कारासाठी पत्रकार हर्षद पाटील यांची निवड ..

केशव भूमि नेटवर्क,  वाडा:- पालघर  जिल्ह्य़ातील  विविध  विषयांवर गेल्या नऊ वर्षापासून   वृत्तांकन करून ते प्रकाश झोतात आणणारे इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार हर्षद रमाकांत  पाटील यांची यंदाचा मशाल गौरव आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  या भव्य पुरस्काराचे वितरण ८ मे रोजी शरद नगर वाडा येथे करण्यात येणार आहे. कुपोषण,  तलासरी रेशन घोटाळा,  आश्रमशाळा, पाणीटंचाई   सार्वजनिक  बांधकाम  विभागातील भष्ट्राचार , रोजगार हमी योजनेतील घोटाळे यासह विविध  सामाजिक  प्रश्नांना प्रसिद्धीत आणण्याचे काम त्यांनी केले  आहे. दरम्यान   पत्रकार हर्षद  पाटील  यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याने पालघर जिल्हातील शासकीय अधिकारी,राजकीय प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,जिल्हातील पत्रकार संघटनेने त्यांचे कौतुक करून ख-या पत्रकारितेला केलेल्या कामाची पोहच पावती मिळाल्याचे सर्व स्तरातून सांगण्यात येत आहे.
एका गरीब शेतकरी कूटूबांत जन्मलेले हर्षद पाटील हे कला शाखेतून इंग्रजी  विषयातून पदवीधर व जर्नाझिलमची पदविका घेतलेले आहेत.

यह भी पढ़े : बोईसर में कल्याणी कुलदीप सांबरे (22 वर्ष) नामक एक महिला की डिलवरी के दौरान दुखद मौत

Related Articles

Back to top button
Close