खबरे

महाराष्ट्र : पालघर जिल्ह्यात 17908 शेतकऱ्यांना कर्जमाफी..

पालघर, दि. 12 डिसेम्बर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 17908 शेतकऱ्यांना  कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 9569 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 1588 शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. 6751 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी  रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.

जे शेतकरी  पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही  या योजनेत सामावून घेणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाणार आहे.

Related Articles

Back to top button
Close