खबरे

वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

नीता चौरे ,पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई चे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना त्यांच्या कार्याची दखल घेत २०१८-१९ या वर्षाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे .

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या सूचनेवरून वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली १० डिसेंबर २०१८ पासून पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात शालेय संस्थेचा परिसर तंबाखू मुक्त करण्याच्या दृष्टीनं पोलीस दलाकडून सिगरेट अन्य तंबाखूजन्य उत्पादने( कोटपा)कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीनं अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती .

पालघर जिल्ह्यातल्या दिव्यांग विदयार्थ्यांच्या कला,क्रिडा स्पर्धा संपन्न……………

या मोहिमे अंतर्गत वसई विभागातल्या २८० शाळा , कॉलेजांना भेट देऊन भेटी दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला .तसचं शाळा प्रशासनाला शालेय परिसरात तंबाखू निषेध क्षेत्र हा बोर्ड लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या .तर कॉलेज व शाळेच्या १०० यार्ड  त्रिजेच्या भागांत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एकूण ६७ अतिक्रमित टपऱ्या , दुकानं रितसर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीनं काढून टाकण्यात आली आहेत .सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( कोटपा) कायदा  २००३ अंतर्गत ८१६ कारवाया करण्यात आल्या असून १,९३,२०० रुपये इतका दंड देखील आकारण्यात आलाय .

या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं विजयकांत सागर यांना २०१८-१९ या वर्षाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर केला असून हा पुरस्कार त्यांना येत्या ३ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे .

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक……….

Related Articles

Back to top button
Close