खबरे

पालघर जिल्हा : जव्हार येथे मतदार दिन उत्साहात साजरा ,नव मतदारांचे स्वागत

पालघर, दि. 25- : नववा मतदार दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली जव्हार शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झाला. सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयीन युवक युवतींना तसेच नवमतदारांना मार्गदर्शन करीत सर्वांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्यांदा मतदार नोंदणी केलेल्या युवकांचा सत्कार करून त्यांना बॅजेसचे वाटप करण्यात आले.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील, जव्हारचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.किरण महाजन तसेच जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

पालघर जिला : तारापुर MIDC मे केमकल कंपनी में आग लगने से 6 कामगार घायल…………

Related Articles

Back to top button
Close