खबरे

पालघर जिल्ह्याच्या 461.41 कोटींच्या प्रारूप नियोजन आराखड्यास मान्यता

केशव भूमि नेटवर्क ,पालघर, दि. 14- : पालघर जिल्ह्याच्या 2019-20 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 461 कोटी 41 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास खासदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, सर्वश्री आमदार आनंद ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विलास तरे, शांताराम मोरे, अमित घोडा, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, वसई विरार मनपा आयुक्त सतिश लोखंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार डॉ.अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाल भारती यांसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री.पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मिळणारा निधी 100 टक्के खर्च करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मांडलेल्या विषयांची गांभिर्याने नोंद घ्यावी व त्यावर तातडीने कार्यवाही करावी. नियोजन समिती सदस्यांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यांची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावयाच्या विषयांबाबत प्रस्ताव सादर करावेत.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 461 कोटी 41 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यात सर्वसाधारण योजनेसाठी 122.29 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 11.61 कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेसाठी 327.51 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. सर्वसाधारण व इतर योजनांमध्ये संबंधित विभागाच्या मागणी प्रमाणे कमाल मर्यादेच्या अधीन राहून तरतूदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 

शिर्डी : साईबाबा संस्थातन विश्वुस्ता च्याल वतीने ५०० रुग्णलवाहिका उपलब्ध होणार, शासनाने दिली ‘साई रुग्णwवाहिका प्रकल्प्’ ल मान्यता……

जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनावर सविस्तर चर्चा करुन त्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. संबंधित विभागांकडून आढावा घेऊन श्री.पाटील यांनी उपयुक्त निर्देश दिले. 

चालू वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचा आढावा घेण्यात येऊन यंत्रणांकडील शिल्लक, बचत आणि अतिरिक्त मागणीच्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. यावेळी सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन संबंधित यंत्रणांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश ही श्री.पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीच्या अनुषंगाने कार्यन्वयीन यंत्रणांनी केलेला खर्च व अनुषंगीक माहिती दिली. 

यावेळी पालघर जिल्ह्यातील पर्यटनावर आधारीत ‘प्लिजंट पालघर’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सदस्य आणि अधिकाऱ्यांना या यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

पालघर : ‘’कवी’’ को लेकर पालघर कलेक्टर ऑफिस पर मछुवारों का मोर्चा, खूनी संघर्ष के बाद भी सरकार की नहीं खुली आंख

Related Articles

Back to top button
Close