खबरे

पालघर : जनते साठी काम करणारे जनतेचे खरे वाली आमदार विलास तरे

पालघर (  कुमार चंदन ): जनतेचा वाली व पदवीधर सामाजिक संस्थेच्यासंयुक्त  विद्यमाने पालघर जिल्ह्यातील ४० महिलांचा स्त्री शक्ती सन्मान गौरव पुरष्कार कार्यक्रम पालघर येथील  शिक्षक पत पेढी  भवन येथे पार पडला . या कार्यक्रमासाठी आमदार विलास तरे यांनी महिलांचा सन्मान करणे अचूक पुरस्काराची निवड समाजत काम करीत असताना जे ही जनतेचे काम करतात प्रेरणा देतात तेच खरे जनतेचे वाली असे सांगिले.
नियोजन समितीच्या सदस्य ज्योती ठाकरे जिल्हा परिषदेच्या सदस्य नीता पाटील ,विनिता कोरे,पालघर नगरसेविका डॉक्टर उज्वला  काळे  मोखाडा पंचायत समिती सभापती सारिका  निकम ,सूर्यवंशी युवक मंडळाचे अध्यक्ष सुनील शेलार ,उमेश पाटील, आसमंत प्रतिष्ठांनच्या अध्यक्ष निशाताई  विष्णु सवरा  , कार्यक्रमाचे अध्यक्ष पी टी पाटिल पदवीधर सामाजिक संस्था चे अध्यक्ष व संयोजक  रमेश हिंदुराव ,संपादक व आयोजक विजय घरत ,निमंत्रक संतोष पावडे ,सकाळ चे ज्येष्ठ  पत्रकार पी एम पाटील यांच्या शुभहस्ते 40 गुणवंत व कर्तबगार महिलांचा स्त्रीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या मध्ये इयत्ता 2रि मध्ये शिकणारी नेहा तुंबडा ही विध्यार्थीनी बऱ्हाणपूर ते कासा हे १३ किमी अंतर एकटी मिळेल त्या रिक्षां ने प्रवास करून शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यावहारिक ज्ञान प्राप्त करीत असून बाजार मधून सर्वप्रकारचा भाजीपाला चांगल्या पद्धतीने खरेदी करून घरी आल्यानंतर किराणा मालाचे दुकान सुदधा चालविते वडिलांची छत्रछाया नसताना देखील तिची आई व ती शिक्षणासाठी जी मेहनत घेतात त्याबद्दल बाल शौर्य पुरस्काराने विशेष सत्कार करून तिचे कौतुक  केले .
सफाळे येथील  पहिली रिक्षा चालक  योगिता मुखर्जी  हिलाही शूर रागिणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पालघर जिल्हयातील जव्हार मोखाडा पालघर आदिवासी भागात महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिलांच्या हातांना स्वयंम रोजगार देण्याचे काम आसमंत प्रतिष्ठान च्या अध्यक्षा निशाताई सवरा करत असून त्यांचाही महिला सखी म्हणून विशेष सत्कार करण्यात आला .मुक्या प्राण्यांची माय डॉक्टर साईली भानुशाली यांचा प्राणी मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला .
बचतगटांची उभारणी व बांधणी करून आदिवासी भागातील शाळाबाह्य मुलांना एकत्र करून साक्षरता प्रकल्प माध्यमातून  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शाळावाली बाई सुवर्णा संतोष पाटील महा ई सेवा केंद्रामार्फत समाजासाठी भरीव योगदानाबद्दल अष्ट पैलू  व्यक्तीमत्व म्हणून पुरस्काराने सन्मान करण्यात आहे वेळी  सकाळ चे पत्रकार  नीरज  राऊत  सामना चे दिनेश तारवी आजतक चे हुसेन खान  महासागर चे जिल्हा प्रतिनधी  abp चे संतोष पाटील  z 24 तास पुण्यनगरी चे हर्षद पाटील  नवभारत चे संजय सिंग..
सकाळ चे प्रमोद पाटील  श्रमिक संदेश चे  रविंद्र दाभाडे  पुढारी चे संदीप जाधव  महासागर सफाले  जतीन कदम  राजेंद्र पाटील  कुमार चंदन तसे जगनाथ घरत उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केले  पुरस्कार मिळालेल्या महिला नी आयोजकांचे  जाहीर आभार मानले  समजला नवी दिशा देण्याचे काम  जनतेचा वाली  पदवीधर सामाजिक संस्था यांनी केले आहे जे जनतेसाठी काम करतात तेच जनतेचे वाली  .

Related Articles

Back to top button
Close