खबरे

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सफाळ्यात ३६० फळझाडांची लागवड

प्रतिनिधि ,सफाले : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान आज शुक्रवार रोजी सफाळे पश्चिमेकडील आगरवाडी येथे व दहाणु,वानगाँव , मध्ये पार पडले. हे अभियान डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जावून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे व्यापक स्वरूपात वृक्षलागवड व संवर्धन अभियान राबवण्यात येत आहे. मागील दोन वर्षात पालघर तालुक्यातील शिरगाव येथे तीन एकरात २ हजार ३७० वृक्षलागवड करण्यात आली. त्यांची उत्तमरित्या जोपासना व संवर्धन करण्यात आल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत आहे. मागील वर्षी केळवा, माकुणसार येथे झालेल्या वृक्षलागवड व संवर्धन अभियानात १७०० वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आली. आजही त्यांचे उत्तमरीत्या संवर्धन होत आहे. प्रतिष्ठानच्या मार्फत या व्यतरिक्तही समाजसेवेचे व समाज परिवर्तनाचे कार्य हाती घेतले जातात.

33

यात स्वच्छता अभियान, सरकारी कार्यालये, प्रौढ साक्षरता, जल पुनर्भरण, पाणपोई, बसस्थानक, शालेय विद्यार्थ्याना साहित्य वाटप आदींचा समावेश आहे. आज शुक्रवार रोजी सफाळे पश्चिमेकडील आगरवाडी-माकुणसार परिसरातील महाराष्ट्र शासनाने मंजूर करून दिलेल्या गट नं ३८१ च्या तीन एकर क्षेत्रात ३१० आणि केलवारोड पोलिस चौकीजवळ ५० फळ झाडाची लागवड करण्यात आली. यात आंबा, चिकू, नारळ, पेरू, काजू, सीताफळ, आवळा, बदाम, फणस आणि काळा व सफेद जांभूळ अश्या विविध जातींच्या फळझाडांचा समावेश आहे. या अभियानाचे उदघाटन सफाळे पोलिस स्टेशनचे सपोनि जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले.

33 2

यावेळी पालघर पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, मंडळ अधिकारी गौरव बंगारा, आगरवाडी ग्रामपंचायत सरपंच रामकृष्ण पाटील, माकुणसार सरपंच जयंत पाटील, उपसरपंच अमोल मोहिते, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाटील, पोलीस पाटील हेमलता कुर्ले, पत्रकार नवीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पालघर बैठक समितीतर्गतच्या एकूण १३ बैठकीतील हजारो श्री सदस्य या अभियानात सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
Close